Ad will apear here
Next
‘विषयावरून कवितेचे श्रेष्ठत्व ठरत नाही’

पुणे : ‘कवितेला कोणताही विषय वर्ज्य नाही. गुलाबाच्या फुलावर कविता केली, म्हणून ती दुय्यम ठरत नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कविता केली म्हणून ती श्रेष्ठ ठरत नाही. विषयावरून कवितेचे श्रेष्ठत्व ठरत नाही,’ असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. रेखा इनामदार-साने यांनी व्यक्त केले. 

‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’तर्फे कवी शांताराम खामकर यांच्या ‘भवताल’ या कवितासंग्रहाला ‘कवी यशवंत पुरस्कारा’ने प्रा. साने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी उपस्थित होते. 

प्रा. साने म्हणाल्या, ‘कविता ही कथाही नसते आणि कादंबरी ही नसते. अतिशय तरल आणि सूक्ष्म अनुभव, नेमक्या शब्दात मांडता येणे महत्वाचे आहे. कवितेची वाट वर वर सोपी दिसत असली, तरी अवघड आहे.’
 
प्रा. जोशी म्हणाले, ‘आजचा वाड़मयीन भवताल प्रदूषित झाला आहे. प्रतिभेच्या नव्या कोंबांना अंकुरण्याआधीच नाऊमेद केले जाते. साहित्य क्षेत्र पोटदुखीने त्रस्त आहे. समकालिनांनी लेखक, कवींना बळ दिले पाहिजे.’ 
    
खामकर म्हणाले, ‘माझ्या कवितेला नाऊमेद करण्याचे खूप प्रयत्न झाले. सामाजिक, अन्याय या विषयावर कविता लिहिल्याच पाहिजेत, असे अनेकांनी सुचवले. कवींना आपापल्या पिंडानुसार कविता लिहिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’

कार्यवाह बंडा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSRBM
Similar Posts
खामकर यांना ‘मसाप’चा पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा कवी यशवंत स्मृती पुरस्कार या वर्षी ‘भवताल’ या कवितासंग्रहासाठी कवी शांताराम खामकर ऊर्फ श्याम यांना जाहीर झाला आहे. एक हजार रुपये आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘जागतिक महिला दिन हा आत्मचिंतनाचा दिवस’ पुणे : ‘जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वतःविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. आज महिला दिनाच्या सोशल मीडियावर पावसासारख्या शुभेच्छा पडत आहे. शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे,’ असे मत डॉ
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुणे : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथ आणि
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language